Tuesday, August 28, 2012

….. काहीतरी करायचं राहिलं ……


….. काहीतरी करायचं राहिलं ……
जन्मलो तेव्हा रडत होतो…. मग हसायला लागलो ,
रेंगाळता रेंगाळता चालता आलं ,… मग उभा राहून धावायलाही लागलो …
ग म भ न गिरवलं … मग A B C D रखडली …
दोनात चार मिळवले … आणि त्यातून तीन वजा सुद्धा केले …
जसा मोठा झालो तसे numbers सुद्धा मोठे झाले ,
+ आणि – बरोबर *, / आणि नंतर derivation, integration सुद्धा आले …
पाढे रटले तेवढ्यात वर्ग मग… घन आले …
गणित काय कमी होतं म्हणून अजुन विषय वाढवले …
आधी O2, CO2, …. H2O मग …
पूर्ण Periodic Table सुद्धा राटावे लागले …
HCl ने कपड्यांना होल्स पाडले ,
Ammonia ( NH3) च्या वासाने डोके भीन भिनले …
कांद्याच्या पातिने डोळ्यात पाणी आणले ,
अमिबा चे चित्र इतके सोपे होते की बंद डोळ्यांनी देखिल ते काढता आले …
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली ,
1857 च्या उठावानंतर भारतात स्वातंत्र्य संग्रामाची लाट पसरली …
माणसाची उत्क्रांती कशी झाली? चीन मधे क्रांति कोणी केली ?
World War केव्हा केव्हा झाले? हिटलर ला कोणी व कसे मारले?
गांधी, नेहरू, टिळक, आंबेडकर, वल्लभभाई पटेल…
हे सगळे सुद्धा इतिहासात येउन गेले …
भारताचे कायदे आणि घटना , नेहमीच पेपरात 10 मार्क्स ला आल्या,
माणसाचे मुलभुत हक्क आणि गरजा , नागरिक शास्त्रात धडा दुसरा पान नंबर सतरा …
भूगोलात वाळवंट, पठार … दगड मात्यांचे वेगवेगळे प्रकार ,
विषुवृत्ताच्या पट्यात ऊन , तर अंटार्टिका मधे ठंडी फार …
नैऋत्य मानसून वारे कशामुळे वाहतात ?
आफ्रिकेच्या जंगलात कुठले वन्यजीव आढ़ळतात ?
पृथ्वी वर 71 टक्के पाणी आणि 29 टक्के जमिन आहे …
असं आहे, तर माणूस चंद्रावर जाण्यापेक्षा पाण्यात रहायला का शिकत नाही ?
Faraday’s, Norton’s, Ohm’s आणि Coulomb’s Laws झाले …
Einstein च्या current ने नेहमीच shock दिले …
KVL, KCL circuits मधे टाकुन voltages काढले …
Y, Z, H, आणि Laplace Transforms सुद्धा काढले …
Acceleration, velocity, force, friction, truss, strain आणि stress वगैरे वगैरे …
काढता काढता calculator चे सेल्स सुद्धा संपले …
आत्तापर्यंत केलेले numbers फ़क्त Decimal होते म्हणून कदाचित …
Binary, Octal आणि Hexadecimal मधे तेच numbers वेगवेगळे दाखवले …
BJT, FET, JFET च्या fabrication steps पाहिल्या आणि circuits सुद्धा बनवले …
8085, 8086 पासून ते मग micro controller चे सुद्धा programs केले …
C, C++, java, Oracle…. SQL …या सुद्धा Languages होत्या …
कोणत्या Radar साठी कोणती आणि Broadcasting साठी Antenna कोणत्या होत्या?
Call splitting पासून Inter cell, intra cell, hard, soft handoffs सुद्धा झाले …
Call Transfer पासून satellite phones चे सगळे concepts आणि working principle समजुन घेतले ….
त्यांनी आधी digital communication मग networking शिकवलं ,
नंतर secure communication साठी Securities ला सुद्धा syllabus मधे टाकलं …
सगळे म्हटले तेच कर जे पुस्तकात लिहलय ,
मी ही तेच कल जे सगळ्यांनी केलय …
या सगळ्यात कुठेतरी काहीतरी करायचं राहून गेलय ,
सगळ्यांच ऐकलं … पण या सगळ्यांत मनाचं ऐकायाच राहून गेलय …
सगळ्यांच ऐकण्यात आयुष्य जायला नको …
म्हणून आता मनाचं ऐकायचं ठरवलय …
इकडच्या या “Narrow Minded” गल्ल्या संपतच नाहित …
म्हणून मग आता वेगळ्याच रस्त्याने जायचं ठरवलं …
कोणी साथ दिली की त्यांच्या बरोबर …
किंवा एकट्यानेच लढ़ायचं ठरवलय …