Thursday, December 22, 2011

Monday, December 19, 2011

प्रेम करायचं राहुन गेलं

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे!
अजुन वेळ गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही .

पहिला दिवस...

me and ....
पहिला दिवस...

अजूनही आठवतोय मला तो पहिला दिवस...!
ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो..!
तिला भेटण्याच्या अतुर्तेमध्ये मला त्या
आदल्या रात्री झोओप आली नाही
कधी एकदाची ती रात्र संपते... आणि
सकाळ होते.. आणि कधी एकदाचा
मी तिला भेटायला जातोय असं मला झाले होते.!
सकाळ झाली मी उठलो, अघोळ केली..!
फुटलेल्या आरशा समोर उभा राहून जुना पण,
स्वच असा ड्रेस मी घातलेला होता..!
केस व्यवसित करून तयार झालो.

आदल्या दिवशी मित्राकडून,
आणलेली सेंट ची अर्धी बॉटल मी,
माझ्या कपड्यावर ओतली.
तेवढ्यातच आई ने आवाज दिला,
नाश्ता तयार आहे खावून जा.

आईला मला नाश्ता नको असे,
बोलत मी खिशामध्ये हाथ घातला,
बघतो तर काय माझाकडे,
फक्त २ नच रुपये होते,
मी आईला कॉलेजची फी भरण्यासाठी ,
५०रुप्ये मागितले तर तिने नकार दिला,
मी तसाच निराश होवून निघालो,
जाता जाता शेजाऱ्यांच्या बागेतील,
एक लाल गुलाबाचे फुल चोरून घेतले.

कधीही लवकर कॉलेजला न जाणारा मी,
आज मात्र सगळ्याच्या अगोदर आलो होतो.
तिला भेटण्याचा एक एक क्षण,
जवळ जवळ येत होता तस-तशी,
माझा मनातली भीती वाढतच जात होती,
पण आज मी निचय करूनच आलो होतो की,
आज तिला विचारल्याशिवाय जायच नाही.

सकाळचे ८ वाजले ती ठरलेल्या वेळेप्रमाणे आली,
नि माझा समोर येवून उभी राहिली.
मी घाबरत घाबरत तिला गुड मोर्निंग बोललो,
तिने पण मला गुड मोर्निंग केले.
तेव्हा कुटे तरी मला थोडेसे बरे वाटले,
नंतर मी तिला बोललो ,
मला तुला काही तरी सांगायचे आहे,
ती लाजत लाजत बोली "बोल"
मी डोळे मिटून धीर धरून तिला
आय लव यु ...! म्हटलं.

तसं तिने खाली वाकून sandal,
पकडणार एवढ्यातच मी तीचापासून,
दूर अंतरावर गालावरती हाथ ठेवून उभा,
राहिलो पण ती sandal ची पट्टी लावत ,
मला सेम टु यु...!!! म्हणाली.

Saturday, December 10, 2011

तो क्षण

मला पुन्हा एकदा तो क्षण जगायचा आहे

खरच मला पुन्हा एकदा शालेत जायचे आहे

शाळेच्या त्...या शेवटच्या बाकावर बसायचे आहे

नविन वही आणि नविन दप्तरचा सुगंध अनुभवायचा आहे

खणखणीत आवाजात पुन्हा पसायध्यान अन राष्ट्गीत मनायचे आहे

मला खरच पुन्हा एकदा तो क्षण जगायचा आहे

आभ्यास केला नाय म्हणुन गुरुजीचा सापाटुण मार खायचा अहे

जोर जोरजोरात बे चे पाढे मणायचे आहे

खिङकीतुन कोसळणनारा पाऊस अन त्यामुळे गळनारी कवले पुन्हा एकदा पाहयची आहेत

मला पुन्हा एकदा तो क्षण जगायचा आहे

दुपारच्या सुटीत आनलेला डबा सगळ्याना वाटुण खायचा आहे अन वाटताना सुध्दा
तो डबा सांडवतच खायचा आहे

पाणी प्यायला त्याच नळावर रांग लाउन ओजळीने पाणी प्यायचे आहे त्यातसुध्दा
पहिले पाणी पिण्यावरुण पार लोळसतोवर मारामारी कारायची आहे

खरच मला पुन्हा एकदा शालेत जायचे आहे

पी.टी.च्या तासाला मला पुर्ण मैदानभर हुदडायचे आहे

दमुण जाततोपर्यत खेळायच्ये आहे

शाळेची घंटा वाजल्यावर पहिले दप्तर घेऊन बाहेय पलायचे आहे

मला पुन्हा एकदा तो क्षण जगायचा आहे

खरच मला पुन्हा एकदा अन एकदा शालेत जायचे आहे

Thursday, December 8, 2011

count characters



This free script provided by JavaScript Kit

Monday, December 5, 2011

आयुष

आयुष्यात स्वप्ने पाहताना,
          वास्तवाला विसरायच नसत,
गुलाबाला स्पर्श करताना,
          काट्याच भान मात्र ठेवायचं आसत,
उधवस्त झालेलं जीवन,
          शून्यतून उभं करायचं आसत,
शत्रूशी लढताना,
          त्याला कमजोर कधी समजायचं नसत,
ख्यालेल्या मिठाला,
          जिवाभावाच्या मित्राला,
                    कधी विसरायच नसत,
आणि आई-वडिलांचे ऋण फेडल्या शिवाय,
          मरण्याचे नाव सुधा घ् याच नसत...

जीवनात चार गोष्टी

जीवनात चार गोष्टी परत भेटत नाहीत,
१) बोललेला शब्द
२) सोडलेला बाण
३) गत आयुष
४) सोडलेली सुसंधी...